धाराशिव येथे अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने जिल्हा आढावा बैठक संपन्न

Spread the love

धाराशिव योद्धा
हनुमंत पाटुळे

धाराशिव दि.१४(प्रतिनिधी) धाराशिव येथे दि.१३एप्रिल रोजी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष स्व.अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव येथे जिल्हा आढावा बैठकिचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत नवनिर्वाचित पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात आल्या व अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या विचाराने प्रेरीत होऊन धाराशिव जिल्हातील शेकडो कार्यकर्त्यांनी संघटनेत जाहीर प्रवेश केला. या बैठकीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून दादासाहेब अण्णासाहेब जावळे पाटील, शेतकरी नेते वि. आ प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील, प्रदेश सल्लागार भगवान दादा माने, मराठवाडा अध्यक्ष देवकर्ण वाघ उपस्थित होते. या बैठकीत मराठा आरक्षण,शेतकरी, विद्यार्थी, महीला व वंचित घटकासाठी छावा संघटना पुर्ण ताकदीने धाराशिव जिल्ह्यात काम करणार असा सर्व पदाधिकारी यांनी निर्धार केला. या बैठकीत धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून लासुना गावचे सुपुत्र रोहित पाटील, वाहतूक आघाडी जिल्हाप्रमुख आकाश सावंत, कळंब तालुकाध्यक्ष विठ्ठल यादव, कळंब तालुका उपाध्यक्ष अभिषेक माने, धाराशिव तालुकाध्यक्ष संतोष सुरवसे,धाराशिव तालुका उपाध्यक्ष पृथ्वीराज खांडवे, धाराशिव तालुका संपर्कप्रमुख लहु शिंदे, धाराशिव तालुका संघटक अभिषेक गरड याच्या निवडी करण्यात आल्या.
या कार्यक्रमाचे आयोजन धाराशिव जिल्हाप्रमुख शशिकांत पाटील व ग्रामीण जिल्हाप्रमुख कालिदास गायकवाड यांनी केले होते.
या कार्यक्रमासाठी संघटनेचे पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *