आश्रुबा कोठावळे लिखित “कथांचे बीजगोळे” कथासंग्रहाचे साहित्यिक श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्रकाशन

Spread the love

धाराशिव योद्धा
हनुमंत पाटुळे

कळंब दि.९ (प्रतिनिधी):-
वाचन संस्कृती वाढावी यासाठी महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाने निवड केलेल्या आश्रुबा कोठावळे यांच्या “शब्दपेरणी बालमनातील ” या बालकविता संग्रहानंतर , वाचकांचा उदंड प्रतिसाद पाहून आश्रुबा कोठावळे यांचे दुसरे पुस्तक ” कथांचे बीजगोळे ” या बालकथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कळंब तालुक्यातील डिकसळ भागातील वेद शैक्षणिक संकुल या संस्थेच्या सभागृहात रविवार (ता.७) रोजी आश्रुबा कोठावळे लिखित ” कथांचे बीजगोळे ” या बालकथासंग्रहाचे प्रकाशन जेष्ठ साहित्यिक डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. श्रीपाल सबनीस होते. उद्घाटक जेष्ठ पत्रकार धनंजय लांबे,अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे,कौशल्य विकास विभागाचे मंत्रालय
मुंबई सहायक आयुक्त संतोष राऊत, स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष के. पी. पाटील, कळंब तालुका पत्रकार संघाचे विश्वस्त सतीश टोणगे या वेळी उपस्थित होते. कथांचे बीजगोळे या पुस्तकाची प्रस्तावना साहित्यिक शरद गोरे यांची आहे. तर जेष्ठ ग्रामीण कथाकार प्रा.भास्कर चंदनशिव यांची पाठराखण आहे. या पुस्तकाचे प्रकाशन प्रितमयी पब्लिकेशन्स यांनी केले आहे.
या वेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवी परमेश्वर पालकर यांनी केले व सुत्रसंचालन महादेव गपाट यानी केले तर आभार आश्रुबा कोठावळे यानी मानले.
यावेळी साहित्यिक के.व्हि.सरवदे, रमेश बोर्डेकर, संतोष लिमकर,सोपान पवार, प्रकाशक प्रितम वेदपाठक, शितलकुमार धोंगडे, अशोक शिंदे, महादेव खराटे, दिलीप गंभीरे, डॉ. अभिजित जाधवर,आप्पासाहेब काळे,रमेश लोकरे,योगीराज पांचाळ, रंजित गवळी, प्रदिप यादव, राजेंद्र बिक्कड,सर्व पत्रकार मित्र , सर्व स्तरातील नागरिक व महीला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *