कळंब येथे आत्महत्याग्रस्त शेतकरी पत्नींना 25 गायींचेपर्याय संस्था व टाटा ए.आय.जी च्या वतीने वाटप

Spread the love

धाराशिव योद्धा
हनुमंत पाटुळे

कळंब दि.8(प्रतिनिधी) पर्याय संस्था व टाटा ए.आय.जी यांच्या वतीने धाराशिव जिल्हयामधील भुम व वाशी तालुक्यातील 25 आत्महत्याग्रस्त शेतकरी पत्नींना गायींचे वितरण दि.7मार्च रोजी करण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन पर्याय संस्था सभागृह हासेगांव के कळंब येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमा करीता पर्याय संस्थेचे सचिव मा.विश्वनाथअण्णा तोडकर, टाटा ए.आय.जी समुहांचे मा.देवांग पांडया, विलास माळी, नॅशनल हेड राजागोपाळ रूद्राराजु, मकरंद महेशपाठक, मिलींद आंब्रे, दिपक गावंडे, दादासाहेब ठोंबरे, बायफ संस्थचे अरूण बिडे, राहुल गोरे तसेच पर्याय संस्थेचे मा.सुभाषजी तगारे, विलास गोडगे, प्रकल्प समन्वयक तेजश्री भालेराव, सुनंदा खराटे, लेखाव्यवस्थापक उमेश टोणपे, डॉ. धनराज पवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात दिपप्रज्वलनाने झाली, त्यानंतर मा.विश्वनाथअण्णा तोडकर यांनी या कार्यक्रमामागची संस्थेची भुमिका सविस्तरपणे मांडली, तसेच टाटा ए.आय.जी प्रतिनिधीनीं देखील टाटा ए.आय.जी सी.एस.आर समुह करत असलेली ​विविध समाज उपयोगी कामांची माहिती दिली. त्यानंतर महिलांना गाय वितरणपत्र वाटप करण्यात आले. लाभार्थी महिलांच्या वतीने काही महिलांनी आपले अनुभव कथन देखील केले, व हा गाय वितरण कार्यक्रम यशस्वी रित्या संपन्न झाला. आभार मा.विलास गोडगे यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेकरीता ऋषिकेश तोडकर, विकास कुदळे, रियाझ शेख, बालाजी शेंडगे, विनायक अंकुश, वैभव चौंदे, व भिकाजी जाधव, रोहिणी ताई गपाट हया सर्वांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *