कळंब येथे भाजप च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Spread the love

धाराशिव योद्धा
हनुमंत पाटुळे

कळंब दि.२(प्रतिनिधी) भारतीय जनता पक्षाच्या वतीने कळंब येथे जिल्हा उपाध्यक्ष संजय घोगरे यांच्या हस्ते इ. १०वी मध्ये उतीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांचा सक्तार भा. ज. पा. तालुका कार्यालयात करण्यात आला. या मध्ये अलसबा रामपुरे,१००% टक्के गुण, कु. प्राजक्ता काळे ९९.२०% टक्के गुण, सार्थक तांबारे९८ % टक्के गुण व कु. भांडे८०% टक्के गुण घेवून उतीर्ण झाले आहेत. त्या बद्दल या सर्वांचा सक्तार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या वेळी माणिक बोंदर, प्रशांत लोमटे, लक्षमण मोहीते, बाळासाहेब खोसे, अनंत काळे, यांच्या हस्ते ही विदयार्थ्यांचा सक्तार करण्यात आला. यावेळी पालक व विदयार्थी उपस्थित मोठ्या संख्येने होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *