वाशी तालुक्यातील कन्हेरी येथे बुद्ध जयंती साजरी

Spread the love

धाराशिव योद्धा
हनुमंत पाटुळे

कळंब दि.22(प्रतिनिधी)
वाशी तालुक्यातील कन्हेरी येथे 2568 वी बुद्ध जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. या वेळी तथागत गौतम बुद्ध भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजा जाणीव संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ लगाडे,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक श्रावण क्षीरसागर यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यानंतर बुद्ध वंदना घेण्यात आली. व पंचरंगी ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर श्रावण क्षीरसागर यांनी प्राचीन बुद्ध धर्माचा इतिहास व आजची अवस्था यावर मार्गदर्शन केले. त्यानंतर जाणीव संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ लगाडे यांनी बुद्ध धर्मातील तत्वे यांचे पालन करून अंधश्रद्धेपासून दूर राहावे व विज्ञानाची कास धरावी यावर प्रकाश टाकला. यावेळी भानुदास इंगळे, रेखा इंगळे, आशाताई इंगळे, विजाबाई खरात, दिलीप खरात, उत्तम खूठे, भीमराव इंगळे, लहू खूठे, किशोर खूठे, सुरेश इंगळे, राजेंद्र इंगळे व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *