कळंब येथे चैत्र पालवी संगीत महोत्सव चे आयोजन

Spread the love

धाराशिव योद्धा
हनुमंत पाटुळे

कळंब दि.७(प्रतिनिधी) प्रती वर्षाप्रमाणे हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी कलोपासक मंडळ कळंब यांच्या वतीने एप्रिल चैत्र गुढीपाडवा पूर्वसंध्येला दि. ८ एप्रिल रोजी सायंकाळी ७.०० वाजता विठ्ठल ,भगवंत मंदिर कळंब येथे चैत्र पालवी संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. झी टीव्ही, सारेगमप विजेती ,आयडॉल फेम, संगीत सम्राट विजेत्या क्लासिकल व्हाईस ऑफ इंडिया कुमारी नंदिनी ,कुमारी अंजली गायकवाड भगिनी यांच्या सुश्राव्य गायन मैफिल आयोजित करण्यात आली आहे. त्यांना अंगद गायकवाड (संवादिनी )रोहन पंढरपूरकर (तबला ) व बंकट कुमार (बैरागी )पखवाज यांची साथ संगत आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कलोपास मंडळाचे यशवंत दशरथ यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *