धाराशिव जिल्ह्यातील १६हजार तर मराठवाड्यातील ३५हजार गायरान धारकांचे अतिक्रमण नियमाकुल करून घरकुल योजना राबवण्याची श्रमीक मानवाधिकार संघाने केली मुख्यमंत्री यांच्या कडे मागणी

Spread the love

धाराशिव योद्धा
हनुमंत पाटुळे

कळंब दि.७(प्रतिनिधी) धाराशिव जिल्ह्यासह मराठवाड्यातील पारधी आदिवासी दलित यांनी गायरान व वन विभाग या जमिनीवरील निवासी अतिक्रमण करून राहत असलेले व शेती प्रयोजनासाठी अतिक्रमण करून कसत असलेल्या जमीनी नावावर कराव्यात अशी मागणी श्रमीक मानवाधिकार संघाच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांना श्रमिक मानवाधिकार संघा च्या वतीने निवेदन देण्यात आले. आज दि.७ फेब्रुवारी रोजी धाराशिव जिल्ह्यातील ढोकी येथिल साखर कारखाना परिसरात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांची भव्य सभा आयोजित करण्यात आली होती. त्या ठिकाणी शिष्टमंडळाच्या वतीने सदरील निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, पारधी आदिवासी समाजाच्या शिक्षण रोजगार व आरोग्य यावर श्रमिक मानव अधिकार संघ गेली 34 वर्षे काम करत आहे. तर धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सचिनओंबासे साहेब व जिल्हा पोलीस अधीक्षक मा.अतुल कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाने व पुढाकाराने धाराशिव जिल्ह्यातील पारधी आदिवासी प्रत्येक पिढिवर पोलीस खाते व महसूल खाते अंतर्गत “पहाट” व “शासन आपल्या दारी” या कार्यक्रमांतर्गत शिबिराचे आयोजन करून पारधी आदिवासी कुटुंबातील व्यक्तींना आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, रेशन कार्ड, नागरिकत्वाचे पुरावे यांचे लाखो प्रमाणपत्र वाटप केलेले आहेत.तसेच पारधी, आदिवासी, दलित, मराठा कुटुंबे शासकीय गायरान जमिनीत व जमिनीतील गावापासून दूर अंतरावर निवासी अतिक्रमण करून राहत आहेत.या मध्ये धाराशिव जिल्ह्यातील ४८४८ व मराठवाड्यातील ३५ हजार १८१ पारधी,आदिवासी, दलित, यांनी गायरान व वन जमिनीवरील शेतीसाठी केलेल्या अतिक्रमण नियमानुकुल करण्यात यावे, धाराशिव जिल्ह्यातील १५४९० पारधी,आदिवासी, दलित, गावातील वन जमिनीवर निवासी अतिक्रमण करून राहत आहेत. त्यांचे नावे प्लॉट करून त्या ठिकाणी घरकुल योजना देण्यात यावी, तसेच शेती प्रयोजनासाठी केलेले अतिक्रमण नियमाकुल करण्यात यावेत, धाराशिव जिल्ह्यातील पारधी आदिवासी पिढी मुख्य रस्त्याला सिमेंट रोड करून जोडण्यात यावी,व त्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करावी,सदरील ठिकाणी फिल्टर प्लांट उभा करण्यात यावा, तसेच त्या ठिकाणी बोरवेल, हात पंप व सार्वजनिक हौद बांधून देण्यात यावा,धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक पारधी पिढी येथे विद्युतीकरण मार्ग पथदिवे, पारंपारिक ऊर्जाद्वारे पथदिवे बसवण्यात यावेत, पारधी पिढीवर पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळा बांधून तज्ञ शिक्षकांची नेमणूक करून शिक्षण देण्यात यावे,व पिढीवर सौर ऊर्जा वर आधारित पोल सह रोहित्र डि. पी. बसवण्यात यावित,व पारधी आदिवासी युवकांसाठी व युतीसाठी बेरोजगार शिबिराचे आयोजन करून उद्योगधंद्यासाठी कर्ज पुरवठा करण्यात यावा,त्या कुटुंबातील युवकांना वैयक्तिक लाभाच्या ट्रॅक्टर, टमटम, किराणा दुकान, रसवंती ग्रह, फुले विकण्यासाठी स्टाॅल, बांगड्या व्यवसाय, पिठाची गिरणी, कूटपालन, शेळीपालन,म्हैस पालन, इत्यादी लाभार्थी योजना देण्यात याव्यात,तसेच धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक पारधी आदिवासी पिढीवर आरोग्य शिबीर घेण्यात यावीत , पिढीवर समाज मंदिरे बांधकाम करण्यात यावीत, माता बाल संगोपन केंद्र उभे करण्यात यावीत, स्मशानभूमीचा विकास करून दफण भूमीची सुधारणा करण्यात यावी, स्मशानभूमीच्या जवळ सिमेंटचा रस्ता करण्यात यावा, पारधी पिढीवर शौचालय व मुतारी बांधकाम करण्यात यावे, व्यायाम शाळा करण्यात यावी,०ते६ वर्ष वयोगटातील सर्व मुला मुलींना व गरोदर मातांना सकस आहार व संदर्भ सेवा मिळत नाहीत त्या तात्काळ पुरवण्यात याव्यात सदरील मागण्यावर धाराशिव जिल्ह्यासाठी विकास पॅकेज देऊन सदरील मागण्या मंजूर करण्यात याव्यात अशा मागण्यांचे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांना देण्यात आले. या वेळी श्रमिक मानवाधिकार संघाचे संस्थापक अध्यक्ष भाई बजरंग ताटे, सचिव सौ. माया शिंदे, मानव अधिकार आंदोलन चे संस्थापक अध्यक्ष हनुमंत भाऊ पाटुळे, आदिवासी समाजाच्या अध्यक्षा सुमनताई काळे, तालुकाध्यक्ष सुनिल गायकवाड,वामन कांबळे या वेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *