बोलणं कमी पण काम जास्त हा सरला खोसे यांचा विशेष गुण – डॉ.अशोक मोहेकर

Spread the love

धाराशिव योद्धा
हनुमंत पाटुळे

कळंब दि.२६(प्रतिनिधी) ज्ञानदानाच्या कर्तव्यनिष्ठतेने आणि शिस्तप्रियतेमुळेच सरला खोसे ह्या संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या आदर्शवत शिक्षिका झाल्या असून त्यांचं बोलणं कमी पण काम जास्त हा विशेष गुण असल्याचे कौतुकास्पद उदगार सचिव डॉ. अशोक मोहेकर यांनी सेवापूर्ती गौरव सोहळ्यात काढले.
ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संचलित विद्याविकास हायस्कूल कन्हेरवाडी ता.कळंब येथील मुख्याध्यापिका श्रीमती सरला खोसे-पाटील यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सेवापूर्ती गौरव सोहळा दिनांक २५ एप्रिल २०२४ रोजी शहरातील हॉटेल तारा येथे संस्थेचे अध्यक्ष अनिल मोहेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव डॉ.अशोक मोहेकर ,माजी कुलगुरू मधुकर गायकवाड,मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश टेकाळे,माजी सभापती भास्कर खोसे,महाराष्ट्र लोकविकास मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वनाथ तोडकर,सेवानिवृत्त मुख्याध्यापक डी.के.कुलकर्णी,संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रमेश मोहेकर,पर्यवेक्षक संभाजी गिड्डे आदींनी सरला खोसे यांनी केलेल्या ज्ञानदानाच्या कार्याचे कौतुक करून उर्वरित आयुष्याला शुभेच्छा देत सामाजिक आणि राजकीय कार्यात झोकून देण्याची अपेक्षा व्यक्त केली.
याप्रसंगी सरला खोसे यांची नात श्रीशा हिचा आपल्या आजीचे शिस्तप्रियता व ममत्वाचे वर्णन करताना कंठ दाटून आला तर स्नुषा प्रा.प्रणिता यांनी सासू आणि सुनेच्या नात्यातील ममत्व वर्णन केले.यावेळी सर्व सभागृह भावनिक झाले होते.
सत्काराला उत्तर देतानी सरला खोसे यांनी संस्थेचे सचिव डॉ. अशोक दादा मोहेकर यांनी मला भावासमान वागणूक दिल्यामुळे संस्था ही संस्था नसून कुटुंब असल्याचे जाणवत असून संस्थेशी माझे स्नेहबंध शेवट पर्यंत कायम राहतील अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कन्हेरवाडी येथील शालेय समितीचे अध्यक्ष अँड.नानासाहेब कवडे यांनी केले.
भारदस्त असे सुत्रसंचलन सहशिक्षिक विक्रम मयाचारी यांनी केले तर आभार सहशिक्षक संजय माळी यांनी मानले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येऊन दीपप्रज्वलन करण्यात आले.
सरला खोसे यांच्या कार्याचा आढावा घेणारा सा.साक्षी पावनज्योतच्या विशेषंकाचे प्रकाशन करण्यात आले.
श्रीमती सरला खोसे यांना शुभेच्छा देण्यासाठी श्री शिवाजी हायस्कूल लातूर,विद्याभवन हायस्कूल कळंब, विद्याविकास हायस्कूल कन्हेरवाडी, संभाजी विद्यालय जवळा,ज्ञान प्रसारक विद्यालय मोहा,संभाजी विद्यालय लिंगी पिंपळगाव,जयभवानी विद्यालय पारा, जि.प.शाळा कन्हेरवाडी येथील शिक्षकवृंद या कार्यक्रमास उपस्थित होते. या वेळी स्नेह भोजनाने या शानदार सोहळ्याची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *