संभाजी विद्यालयात भारतरत्न , घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

Spread the love

धाराशिव योद्धा
हनुमंत पाटुळे

कळंब दि.१४(प्रतिनिधी) वाशी- पिंपळगाव (लिंगी) येथील संभाजी विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्व प्रथम महामानवाच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेचे मुख्याद्यापक युवराज सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.१४ एप्रिल रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि देशातील महान नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. बाबासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य भारतातील मागासवर्गीय, दलित, गरीब यांच्या उन्नतीसाठी खर्ची केले. ते एक प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ, न्यायशास्त्रज्ञ आणि राजकारणी होते. त्यांनी केवळ सामाजिक न्याय आणि सामाजिक विषमतेविरुद्धच लढा दिला नाही तर महिला सक्षमीकरणासाठीही बाबासाहेबांनी खूप काम केले. असे प्रतिपादन प्रशालेचे मुख्याध्यापक युवराज सावंत यांनी केले .
यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक सुनिल बावकर, संतोष ढोले, संतोष बोडके, सुहास जगताप, तर शिक्षकेत्तर शिवराम शिंदे, (पत्रकार ) लहु फुरडे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *