एकल महिला विधवा परीतक्त्या बिना लग्नाच्या न म्हणता अभया संबोध व्हावे प्रत्येक ग्रामसभेत ठराव घ्यावा रामभाऊ लगाडे

Spread the love

कळंब दि.११(प्रतिनिधी) वाशी येथे दत्त मंदिर सभागृहामध्ये वंचित विकास जाणीव संघटनेच्या वतीने एकल महिलांच्या महिला मेळाव्यात रामभाऊ लगाडे बोलत होते. ते म्हणाले कि, समाजातील विधवा, परितक्त्या दिव्यांग असे न म्हणता त्यांना अभया म्हणावे व त्यांचा मान सन्मान करावा, ग्रामसभेतून मंजुरी घ्यावी असे मत व्यक्त केले. या वेळी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दत्त मंदिर सभागृहामध्ये महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शन म्हणून भीमराव घुले सर, साधना विश्वेकर, मानव अधिकार आंदोलन च्या महीला तालुका अध्यक्षा आशाताई शिंदे,एडवोकेट सौ. देशमुख एस एस, मनीषा चौधरी, रंजना चव्हाण, लतिपा जागीरदार या  उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वाशीच्या नगरअध्यक्षा विजयाताई गायकवाड होत्या. या वेळी मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक जाणीव संघटनेचे तालुकाध्यक्ष सुभाष गाडे यांनी केले. यानंतर एडवोकेट देशमुख मॅडम यांनी कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 यावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर साधना विश्वेकर यांनी महिलांचे कर्तव्य अधिकार याच्यावर भाष्य केले. रंजना चव्हाण राबिया शेख यांनी आपली मते व्यक्त केली. यानंतर रामभाऊ लगाडे यांनी महिलांच्या समस्या त्यावर उपाय व महिलांचे सक्षमीकरण यावर मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रमुख पाहुणे भीमराव घुले यांनी महिलांना जागृत राहून कुटुंबाचा सांभाळ करावा व उद्योगधंदे काढून व्यक्तिमत्व सुधरावे व डॉक्टर राहुल घुले यांच्या कार्याचा आढावा मांडला. या महामेळाव्यात खालील ठराव घेण्यात आले. यामध्ये एकल महिलांना सामाजिक व आर्थिक दर्जा मिळवण्यासाठी व त्यांना सत्ता, संपत्ती, रेशन कार्ड, घरकुल, व्यवसायाकरीता  कर्ज शासकीय योजना पेन्शन याबद्दल माहिती.कौटुंबिक हिसाचार कायदा 2005 याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी असा ठराव घेण्यात आला. या वेळी वाशी तालुक्यातील 25 गावातून तीनशे ते चारशे महिला या मेळाव्याला उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला सीमा लगाडे, अक्काबाई काळे, अंजना गायकवाड, आशा गायकवाड, अनिता पिसाळ, शहानुर पठाण, सीमा यादव, ताई सुरवसे, सारिका सिरसागर, रेखा राजगुरू, पल्लवी गुंजाळ, किरण लगाडे, भीमराव पवार,पंढरी मुळे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *