ईपीएस 95 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये आचारसंहिता सुरू होण्या आधी वाढ करण्याची वृद्ध कर्मचाऱ्यांची मागणी

Spread the love

धाराशिव योद्धा
हनुमंत पाटुळे

कळंब दि.12(प्रतिनिधी) ईपीएस 95 सेवानिवृत्त कर्मचारी यांना अल्प पेन्शन मिळते या पेन्शनमध्ये 2024 लोकसभा निवडणूक आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी वाढ करावी अशी मागणी eps-95 सेवा निवृत्त कर्मचारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या विषयी मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी कळंब यांच्यामार्फत eps-95 सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष अच्युतराव माने व उपस्थित कर्मचारी यांनी दिनांक 11 मार्च रोजी दिले असून हे निवेदन कार्यालयीन अव्वल कारकून श्रीमती व्ही.
के. रणदिवे यांनी स्वीकारले या निवेदनात औद्योगिक क्षेत्रात काम करणारे देशभरातील वयोवृद्ध 75 लाख कर्मचारी, ईपीएस 95 निवृत्त कर्मचारी समन्वय व लोक कल्याण संस्था राष्ट्रीय वरिष्ठ नेते अशोक राऊत व अन्य नेत्यांच्या नेतृत्वात गेली दहा वर्ष आपल्या अल्प पेन्शन मध्ये वाढ व्हावी यासाठी संघर्ष करीत आहेत. परंतु केंद्र सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.या निवेदनात खालील चार प्रमुख मागण्या मागण्यात आल्या आहेतया मध्ये पेन्शन रुपये 7500 अधिक महागाई भत्ता मिळावा, सरकारी कर्मचाऱ्यांना उच्च पेन्शनमध्ये लाभ मिळावा, कर्मचारी पती-पत्नीला मोफत आरोग्य सेवा मिळावी, बिगर ईपीएस सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना 5000 हजार रुपये पेन्शन मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रसंगी ईपीएस 95 सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष अच्युतराव माने, अनुरथ पवार, रामभाऊ कवडे, विनायक दशरथ, गुलाब बागवान, राम सोनवणे, कमलाकर मुळीक, गोरोबा माळी, बशीर पठाण, महादेव लकडे ,अरुण गायकवाड, भारत मानमोडे, बापूराव झाल्टे ,उत्तरेश्वर शिंगणापूरे ज्येष्ठ नागरिक महासंघाचे मराठवाडा प्रदेश सहसचिव डी. के . कुलकर्णी, तालुका सचिव माधवसिंग राजपूत ,सामाजिक कार्यकर्ते संदीप कोकाटे, यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *