कळंब येथे हनुमान जन्मोत्सव निमित्त अखंड हरिनाम सप्ताह

Spread the love

धाराशिव योद्धा
हनुमंत पाटुळे

कळंब दि.१४(प्रतिनिधी) कळंब येथील दक्षिण मुखी हनुमान मंदिर येथे प्रती वर्षा प्रमाणे दि. १६ एप्रिल २०२४ ते २३ एप्रिल २०२४ या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वैकुंठवासी गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली उत्तरेश्वर पिंपरीकर व गुरुवर्य रामचंद्र बोधले महाराज डिकसळ यांचे कृपाशीर्वादाने व प्रमुख मार्गदर्शक ह भ प ज्ञानसिंधू संदीपान महाराज हासेगावकर ह भ प अन्नदाता नारायण महाराज भाऊ उत्तरेश्वर पिंपरीकर ह भ प गुरुवर्य दत्ता महाराज आंबिरकर यांच्या कुशल मार्गदर्शनाने दक्षिणमुखी हनुमान मंदिर कसबा पेठ कळंब येथे हनुमान जयंतीच्या निमित्ताने दिनांक १६ एप्रिल २०२४ ते २३ एप्रिल २०२४ या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण कार्यक्रम संपन्न होत आहेत सप्ताहासाठी प्रार्थनीय उपस्थिती ह भ प ज्ञान सिंधू संदीपान महाराज शिंदे हासेगा़ंवकर व ज्ञानेश्वरी वाचक ह भ प महेश महाराज मोरे तेर हे आहेत दैनंदिन कार्यक्रम काकडा भजन ,विष्णुसहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, महिला भजन, प्रवचन ,हरिपाठ, हरी किर्तन सेवेसाठी ह भ प महेश महाराज भोरे तेर ह भ प ज्ञानेश्वर महाराज बोराडे गोटेगाव, दत्तात्रय महाराज आंबिरकर डिकसळ, ह भ प महादेव महाराज ढाकणे भागवताचार्य (ज्ञानेश्वरी कंठस्थ आळंदी देवाची) ह भ प ज्ञानेश्वर महाराज नामदास संत नामदेव महाराज वंशज पंढरपूर ,ह भ प गणेश महाराज सोनवणे आळंदी देवाची, भागवताचार्य ह भ प नारायण भाऊ महाराज उत्तरेश्वर पिंपरी, दिनांक २२ एप्रिल रोजी दुपारी ४ ते ६ ज्ञानेश्वरी ग्रंथ ,भागवत ग्रंथ व संत तुकाराम महाराज गाथा भव्यदिव्य मिरवणूक, दिंडी प्रदक्षणा महिला दिंडीचे नेतृत्व माजी नगरसेविका मीरा भागवत चोंदे व गावातील महिला भजनी मंडळ यांचा सहभाग दिनांक २३ एप्रिल रोजी सूर्योदय वेळी हनुमान जन्मोत्सव साजरा होईल व सकाळी १० ते १२ श्री ह भ प ज्ञान सिंधू संदीपान महाराज शिंदे पाटील अध्यक्ष व परीक्षक जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था यांचे काल्याचे किर्तन होईल नंतर ह भ प शिवाजी अप्पा दिगंबर कापसे माजी नगराध्यक्ष यांचा महाप्रसाद होईल कार्यक्रम नियोजन ह भ प आबासाहेब शिंदे गुरुजी चत्रभुज आप्पा चोंदे सप्ताह व्यवस्थापक, रघुनाथ चोंदे, लिंबराज नाना चोंदे, मुरलीधर (काका) चोंदे, अतुल कवडे ,दिलीपसिंह देशमुख, नागनाथ शेंडगे ,नागनाथ माळी, पांडुरंग गुरव, मनोहर हारकर ,भागवत चोंदे, दिनकर वाडे ,तानाजी कदम, हरिभाऊ चौधरी ,जगन्नाथ चोंदे, बबन वाघमारे, पांडुरंग माळवदे, बंडोपंत जोशी , भागवत मंडाळे ,बाळू मंडाळे, संजय मुंडे ,शिवाजी भाकरे नागनाथ माळी बब्रु चोंदे, व समस्त कळंब गावकरी मंडळ यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *