जगद्गुरू नरेंद्राचार्य जी महाराज यांचा समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा !

Spread the love

धाराशिव योद्धा
हनुमंत पाटुळे

कळंब दि.९(प्रतिनिधी) अनंत श्री विभूषित जगदगुरू समानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज, जगदगुरू रामानंदाचार्य, दक्षिण पीठ, नाणीजधाम, ता. जि. रत्नागिरी यांचा समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा दि. १३ व दि. १४ मार्च २०२४ रोजी, श्रीक्षेत्र माऊली माहेर, सिमूरगव्हाण, ता. पाथरी, जि.परभणी या ठिकाणी संस्थानाच्या अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आला आहे.अशी माहिती संस्थांनामार्फत एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे .
या कार्यक्रमाच्या अनुषंगाने संस्थानाच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. जसे की ग्राम स्वच्छता अभियान, शैक्षणिक उपक्रम, वैद्यकीय उपक्रम, आर्थिकष्ट्या दुर्बल घटकांचे पुनर्वसन, महिला सक्षमीकरण, आपत्कालीन मदत उपक्रम, कायदेविषयक साक्षरता शिबिरे आयोजित केली जातात. संस्थानाच्या Blood In Need उपक्रमांतर्गत दि. १० ते २५ फेब्रुवारी २०२४ या दरम्यान संप्रदायामार्फत ७ राज्यात ८५० रक्तदान शिबिरात एकूण ८९,२६० कुपिकाचे रक्त संकलन करण्यात आले. तसेच ज्या रुग्णांना रक्ताची गरज भासते त्या रुग्णांना त्या हॉस्पिटल येथे जाऊन आज पर्यंत १८,५४८ रुग्णांना रक्त देऊन प्राण वाचवले आहेत. तसेच संस्थानावा मरणोत्तर देहदान हा उपक्रम जनमानसामध्ये अत्यंत प्रभावीपणे यशस्वी होत आहे. सप्टेंबर २०१६ ते मार्च २०२४ या कालावधीत ५३ मरणोत्तर देह समाजाच्या सेवेसाठी शासकीय मेडिकल कॉलेजना सुपूर्द करण्यात आले आहेत. महामार्गावरील अपघात ग्रस्तांसाठी राज्यातील सहा राष्ट्रीय महामार्गावर ५२ रुग्णवाहिका विनामूल्य सेवा करत असून आतापर्यंत २० हजार जखमींचे प्राण वाचण्यात यश आले आहे. दि . १३ व १४ मार्च २०२४ या दिवशी जगदगुरु श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचे अध्यात्मिक अमृततुल्य प्रवचन होणार आहे. सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन मराठवाडा पीठ उत्सव सेवा समितीने व धाराशिव जिल्हा सेवा समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *