डॉ.बापूजी साळुंखे विधी महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा

Spread the love

धाराशिव योद्धा
हनुमंत पाटुळे

धाराशिव दि.८(प्रतिनिधी)
डॉ.बापूजी साळुंखे विधी महाविद्यालय, धाराशिव येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या वेळी विचारमंचावर प्राचार्य डॉ. कायला कृष्णमूर्ती, डॉ.व्ही.जी शिंदे, डॉ स्मिता कोल्हे, प्रा चंदनी घोगरे,डॉ. पौर्णिमा तापडिया,
प्रा. सोनाली पाटील यांच्या समवेत प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती प्रज्ञा बनसोडे (सामाजिक कार्यकर्त्या, DWCD विभाग) उपस्थीत होत्या. प्राचार्य डॉ. कायला कृष्णमूर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक डॉ. स्मिता कोल्हे व सहसमन्वयक डॉ. नितिन कुंभार यांनी यशस्वी नियोजन केले. कार्यक्रमाची सुरवात डॉ. बापुजी साळुंखे व संस्थामाता श्रीमती सुशीलादेवी साळुंखे यांच्या प्रतिमांचे पूजन करून
कु. ज्ञानेश्वरी जाधवर समवेत संस्थागिताचे सामूहिक गायनाने करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. श्रुती जाधव यांनी केले.
प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडताना डॉ स्मिता कोल्हे यांनी जागतिक महिला दिनाची पार्श्वभूमी, महत्व व जगभरातील कर्तृत्ववान महिला व्यक्तिमत्त्वांविषयी विचार व्यक्त केले. यानंतर प्राचार्य डॉ. कायला कृष्णमूर्ती यांनी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांच्या अधिकारांच्या संदर्भाने असलेल्या कायदेशीर तरतुदी , भारतीय संविधान आणि स्त्री – पुरुष समानता याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. डॉ. व्ही जी शिंदे यांनी महिला सक्षमीकरण व सबलीकरण करण्यासाठी आवश्यक उपाय या विषयी विचार व्यक्त केले. प्रा. चंदनी घोगरे यांनी राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, यांच्या महान कार्य कर्तृत्वाची माहिती दिली.
प्रा. सोनाली पाटील यांनी महिलांच्या जीवनातील विवीध पैलू,जबाबदाऱ्या आणि स्त्री शिक्षणाचे महत्त्व कवितेद्वारे विषद केले.
डॉ. पौर्णिमा तापडिया यांनी महिलांच्या जीवनातील कौटुंबिक जबाबदाऱ्या व महिलांच्या शिक्षण व आर्थिक स्वावलंबनाचे महत्त्व समजावून सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी श्रीमती प्रज्ञा बनसोडे यांनी महिलांचे आरोग्य, महिलांना शैक्षणिक क्षेत्रातील संधी, कौटुंबिक हिंसा, हुंडाबळी बालविवाह या विषयांवर मार्गदर्शन केले. त्याच बरोबर समजात काम करत असताना आलेल्या प्रत्यक्ष अनुभवांचे कथन त्यांनी केले. प्रसंगी डॉ. इकबाल शाह, डॉ संजय आंबेकर, प्रा. श्रियश मैंदरकर , प्रा. अजित शिंदे, प्रा. कैलाश शिकारे यांच्या समवेत कार्यालयीन कर्मचारी श्री. प्रदीप गायकवाड ,श्री. संजय क्षीरसागर, श्री. बाशिर अत्तार, श्री.आकाश कवडे, श्री.राहुल ओव्हाळ व मोठया प्रमाणात विदयार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते.
आभार प्रदर्शन कु. गौरी ढोबळे यांनी केले.कार्यक्रमाची सांगता सामूहिक राष्ट्रगीताने करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *