खामसवाडी येथे जागतिक महिला दिन निमित्त ३५ महिलांचा सत्कार

Spread the love

[कार्यक्रम उत्साहात साजरा दोनशे महिलांची उपस्थिती]

धाराशिव योद्धा
हनुमंत पाटुळे

खामसवाडी दि. ८ (प्रतिनिधी)कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे दि. ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ३५ मांताचा सत्कार करण्यात आला.
खामसवाडी येथील प्रकाश जोशी व आत्माराम सोनवणे यांच्या संकल्पनेतून दि. ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनी गरिबीतुन स्वकर्तृत्वावर पुढे गेलेल्या गुणवंत मुलांमुलींच्या ३५ मांताचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास प्रा. मनोरमा भवर, नरहिरे मॅडम, सांवत मंदाकिनी, कोळी मॅडम, रूपाली कुलकर्णी, नयना कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पुजनाने करण्यात आली. त्यांनंतर शिवकांता चांदणे, सत्यभामा सोनवणे, इजिनिअर धनंजय शेळके, पोलीस निरीक्षक मोक्षदा गर्जे, पोलीस निरीक्षक शेषेराव शेळके, डॉ स्वप्नील शेळके, डॉ,मनोरमा निर्फळ यांच्या सह ३५ मांताचा शाल, श्रीफळ, गुच्छ देवुन सत्कार करण्यात आला.या वेळी मनोरमा शेळके, मंदाकिनी सांवत यांनी विचार मांडले. कार्यक्रमाचे आयोजक प्रकाश जोशी व आत्माराम सोनवणे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत सुरवसे यांना केले तर आभार सुनील पाटील यांनी मानले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *