कळंब पंचायत समिती कार्यालया समोर मातंग समाजाच्या स्मशानभूमी प्रकरणी सत्याग्रह आंदोलन

Spread the love

धाराशिव योद्धा
हनुमंत पाटुळे

कळंब दि.२६ (प्रतिनिधी) कळंब तालुक्यातील मंगरूळ येथील मातंग समाजाच्या स्मशानभुमी प्रकरणी आज दि.२६ मार्च रोजी श्रमीक मानवाधिकार संघाचे संस्थापक अध्यक्ष भाई बजरंग ताटे यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. या बाबतीत अधिक वृत्त असे की, मौजे मंगरूळ तालुका कळंब जिल्हा धाराशिव येथील मातंग समाजाच्या स्मशानभूमीमध्ये गट नंबर १ मध्ये १०गुंठे क्षेत्र मातंग समाजाच्या स्मशानभूमीचे आहे. सदर क्षेत्राची मोजणी करून घेतलेली आहे. तेव्हा मंगरूळ येथील ग्रामपंचायतने शवदाहीणी बांधकामासाठी त्या ठिकाणी खडी, सीमेंट, वाळू, घेऊन खड्डे घेतले आहेत. व शवदाहीनी बांधकाम करत आहेत. परंतु गावातील शेतकऱ्यांनी या शवदाहीनीचे बांधकाम आडविले आहे.बांधकाम आडविल्यानंतर बांधकामाचे सर्व साहित्य एक महिना सदर क्षेत्रामध्येच तसेच पडून होते. परंतु काही दिवसानंतर सदर साहित्य ग्रामपंचायतने उचलून घेऊन गेलेले आहेत. सदर बांधकाम अडविण्याचे कारण शेतकऱ्यांच्या शेतात जाण्या येण्यासाठी रस्ता हवा होता. त्यामुळे बांधकाम आढविले होते. तेव्हा कळंबचे मा.तहसीलदार साहेब यांनी ग्रामसेवक ग्रामपंचायत मंगरूळ विरुद्ध भीमा गणपती बोंदरे व इतर आठ विरुद्ध मा. तहसीलदार साहेबांनी दोन वेळा सुनावणी घेतली. सदर सुनावणी मध्ये मा.तहसीलदार कळंब यांनी जावक क्रमांक २०२४/मह जमा-२ कावी- २९१ प्रमाणे निकाल देऊन मौजे मंगरूळ येथील जमीन गट नंबर १ व ७३३, ७३२,७३१ चे बांधावरून रस्ता देणे योग्य होईल करिता प्रकरणात मंडळ अधिकारी मोहा यांनी उक्त नमूद केल्याप्रमाणे रस्ता खुला करून देण्यात यावा असाही आदेश देण्यात आलेला आहे. त्या आदेशाची प्रत मा. ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालय मंगरूळ यांना देण्यात आलेली आहे. तेव्हा मौजे मंगरुळ ता. कळंब येथील मातंग समाजाच्या वतीने दि.२६ मार्च पासून पंचायत समिती कळंब कार्यालयासमोर व मा. गटविकास अधिकारी पंचायत समिती कळंब यांच्या केबिन समोर आज सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात खालील मागण्या करण्यात आल्या. या मध्ये मंगरूळ तालुका कळंब येथील मातंग स्मशान भूमी गट नंबर १ मध्ये १०आर क्षेत्रांमध्ये शिवदाहिनी चे तात्काळ बांधकाम सुरु करण्यात यावे, तसेच सदरील क्षेत्रावर कंपाउंड बांधकाम करण्यात यावे, त्यामध्ये दोन खांब उभे करून त्या ठिकाणी मोठी मर्क्युरी लाईट लावण्यात यावी, स्मशानभूमीमध्ये कुप नलिका (बोअर) घेऊन पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, मातंग समाजाच्या समाज मंदिरापासून स्मशानभूमी पर्यंत जाण्यासाठी आडवा ओढा लागतो त्यावर पूल बांधून सिमेंट रस्ता करण्यात यावा, त्या ठिकाणी पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात यावे. आदी मागण्या करीता आज दि. २६ मार्च २०२४ रोजी कळंब पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या वेळी मंगरुळ चे ग्रामसेवक श्री.सोनवणे यांनी उद्या तात्काळ स्मशानभुमी चे काम सुरू करत असल्याचे व शिराढोण पोलिस ठाण्याला काम आढवणार्या व्यक्तिवर कार्यवाही करण्यात येईल असे लेखी पत्र दिल्याने सदरील सत्याग्रह आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनामध्ये श्रमिक मानवाधिकार संघाच्या जिल्हा अध्यक्षा सौ.माया शिंदे,मानव अधिकार आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत पाटुळे, विनोद कांबळे,आकाश राजहंस, किशन कांबळे, कुंदन जाधव, सटवा कांबळे, बाळासाहेब कांबळे,शिवराज कांबळे, माणिक कांबळे, प्रताप कांबळे, बालाजी कांबळे,अभिषेक कांबळे, कुणाल कांबळे,मधुकर कांबळे,केतन कांबळे,विजय कांबळे, सुभाष कांबळे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *