करंजकल्ला शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात चिमुकल्यांचा जल्लोष

Spread the love

कळंब दि.12(प्रतिनिधी )
11 मार्च 2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजकल्ला या शाळेमध्ये विविध गुणदर्शनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने व दीप प्रज्वलन करुन मा.धर्मराज काळमाते गटशिक्षणाधिकारी पं. स. कळंब, संभाजीराव जगदाळे शिक्षण विस्तार अधिकारी बीट लोहटा(पुर्व), सुब्राव कांबळे,नरहरी नान्नजकर केंद्रप्रमुख लोहटा(पु), विनोद पवार (शा.व्य.समिती अध्यक्ष तथा उपसरपंच), विशाल पवार (माजी सरपंच) औदुंबर हिंगमिरे (पोलीस पाटील) सौ.मीरा पवार(शा.व्य.समिती उपाध्यक्ष),अशोक कांबळे ( केंद्रीय मुख्याध्यापक), सुरेश गायकवाड, वसंत वैद्य (माजी मुख्याध्यापक), अरुण पवार या मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये देशभक्तीवरील गीते, कोळीगीते, शेतकरी गीते, दारूबंदीवरील गीते, लावणी, बालगीते, लोकगीते, उखाणे, विनोदी संवाद व नकला अशा विविध भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शाळेतील शंभर टक्के विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
नुकताच शाळेने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक मिळवल्यामुळे ग्रामस्थांमध्ये शाळेविषयी कमालीचा उत्साह दिसून येत होता. शाळा व्यवस्थापन समितीने शाळेवर विद्युत रोषणाई केली होती. ग्रामस्थांनी भरघोस बक्षीसे देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेचे मुख्याध्यापक भक्तराज दिवाणे यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम ढेपे व भंडारे बापु यांनी केले. तर आभार प्रदर्शन कुलकर्णी अखिल यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक बोंदरे बाबू ,कसबे संघरत्न, डोंगरे अनंत, सौ.स्मिता कुलकर्णी व सौ.अनिता रानभरे यांनी परिश्रम घेतले. तसेच विठ्ठल माने, बाळासाहेब कांबळे, मधुकर माने, दिलीप पवार, परमेश्र्वर पवार,राजाभाऊ पवार, सचिन माने यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी गावातील माता, पालक, ग्रामस्थ व इतर गावातील नागरिकांनी गर्दी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *