खामसवाडी -मंगरुळ रस्त्याच्या साईटपट्टीवरील झाडे झुडपे तोडण्याची मागणी

Spread the love

धाराशिव योद्धा
हनुमंत पाटुळे

खामसवाडी दि.२०(प्रतिनिधी) कळंब तालुक्यातील खामसवाडी-मंगरुळ रस्त्याच्या साईटपट्टीवर काटेरी बाभळीची झाडे झुडपे वाढली असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन त्याचा त्रास वाहण चालकांना होत आहे. खामसवाडी हे कळंब तालुक्यातील लोकसंख्येने मोठे गाव असल्याने या गावचे ब-यापैकी व्यवहार हे कळंब ला होतात. तर कळंब हे तालुक्याचे ठिकाण असल्याने या ठिकाणी तहसील, पंचायत समिती व कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या सह अन्य महत्वाची कार्यालये आहेत. तर या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते तर खामसवाडी मार्गे धाराशिव ला जाण्यासाठी जवळचे अंतर असल्याने याच मार्गावरुन चार चाकी सह दुचाकी वाहने वाहतात परंतु या रस्त्याच्या दोन्ही बाजूने काटेरी बाभळीची झाडे झुडपे वाढली असल्याने वाहनचालकांना त्रास होत आहे.तर या झाडामुळे आडवळणाला अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदरील रस्त्यावरील वाढलेली काटेरी बाभळीची झाडे झुडपे तात्काळ बांधकाम विभागाने तोडुण घ्यावी अशी मागणी वाहन चालकातुन व मानव अधिकार आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत भाऊ पाटुळे यांच्या वतीने होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *