खामसवाडी येथे जगदंबा कन्या प्रशालेच्या वतीने गुणवंताचा सत्कार

Spread the love

धाराशिव योद्धा
हनुमंत पाटुळे

खामसवाडी दि.२८(प्रतिनिधी) कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील जगदंबा कल्या प्रशालेचा इयत्ता दहावीच्या निकालात उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंताचा संस्थेच्या वतीने दि. २८ हे २०२४ रोजी प्रशालेत सत्कार करण्यात आला.
मार्च २०२४ मध्ये झालेल्या इयत्ता दहावी परिक्षेत चांगल्या निकालाची परंपरा कायम ठेवत जगदंबा कन्या प्रशालेचे सर्व विद्यार्थी चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाले असुन गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष अशोक त्रिंबकराव शेळके यांनी केले होते. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी विष्णुदासजी तापडे होते तर सचिव गणपती यादव, सुरेश पाटील, सुनिल पाटील, सुनिल जोशी, शंकर तांदळे,शहाजी शिंदे , सतिश माने, दिगांबर शेळके, मुख्याध्यापिका सांवत एम. आर. यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी गुणवंत विद्यार्थी श्रध्दा शिंदे, भारती शेळके, सिध्दी शेळके, वैभवी राजमाने, श्रुती शिंदे, पुजा सांगळे, नम्रता तांबारे, ओंकार गाढवे, नैतिक शेळके, अजय शेळके, प्रतिक शेळके, विकास खरात, कृष्णा पवार, समर्थ शेळके आदी गुणवंत विद्यार्थ्यांचा व पालकांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, फेटा, श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला. या वेळी पालक ग्रामस्थ मोठया संख्येने हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *