खामसवाडी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Spread the love

धाराशिव योद्धा
हनुमंत पाटुळे

खामसवाडी दि.२(प्रतिनिधी) कळंब तालुक्यातील खामसवाडी येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधत कै. व्यंकट भाऊ बंडगर प्रतिष्ठान खामसवाडी यांच्या वतीने खामसवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एटीएस राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा कै. व्यंकट भाऊ बंडगर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य श्री नितीन व्यंकट बंडगर यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व शालेय साहित्याचे वाटप करून सन्मान करण्यात आला. या वेळी गावचे सरपंच श्री. अमोल पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कोळी मॅडम,शिक्षक वृंद व ग्रामस्थ या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *