लहुजी शक्ती सेनेच्या वतीने कळंब तहसीलदार यांना निवेदन

Spread the love

धाराशिव योद्धा
हनुमंत पाटुळे

कळंब दि16(प्रतिनिधी) कळंब तहसील कार्यालय यांना दि.15 फेब्रुवारी रोजी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले यामध्ये लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळ धाराशिव यांच्याकडून कळंब तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँकांना आलेले कर्ज प्रस्ताव तात्काळ मंजूर करण्यात यावे, व तहसील कार्यालय अंतर्गत केसरी शिधापत्रिकाधारकांची शोध मोहीम राबवून त्यांचा अन्नसुरक्षा योजनेचा लाभ देण्यात यावा या मागणीसाठी सदरील निवेदन देण्यात आले आहे सदरील निवेदनावर लहुजी शक्ती सेनेचे कळंब तालुका अध्यक्ष पांडुरंग भाऊ कदम, लहुजी शक्ती सेना धाराशिव जिल्ह्याच्या महिला नेत्या अश्विनी साठे, लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा संघटक बालाजी उपरे, लहुजी शक्ती सेनेचे प्रसिद्ध प्रमुख विकास गायकवाड, लहुसैनिक दीपक कसबे, नितीन वाघमारे, या वेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *