कोर्टाच्या आदेशालाही महावितरण कडून केराची टोपली , वीज खंडित करू नका म्हणून आदेश असतानाही वीज पुरवठा तोडला ,नागरिक पुन्हा कोर्टात अधिकाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी

Spread the love

धाराशिव योद्धा
जिल्हा प्रतिनिधी

कळंब दि.२७(प्रतिनिधी) सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या बोरच्या वीज बिल अवाच्या सव्वा अकारणी संदर्भात नागरिकांनी कोर्टात न्याय मागणी करताच न्यायालयाने मनाई आदेश दिला पण न्यायालयाचा आदेशही महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी झुगारून कोर्टाच्या आदेशाला केराची टोपली एक नाही तर दोन वेळा दाखवून वीज पुरवठा अखेर सुरळीत केलाच नाही. अशा कामचुकार व मनमानी करणाऱ्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून पुन्हा न्यायालयात केली आहे. न्यायालय या अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .
याबाबत अधिक वृत्त असे की, कळंब शहरातील प्रतिष्ठित समजली जाणारी साईनगर हाऊसिंग को-ऑपरेटिव्ह सोसायटी चा सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या बोरचा महावितरणाने वीज पुरवठा खंडित केला आहे. हे विज बिल अव्वाच्या सव्वा आकारणी केली. या बिलासाठी साई नगरीने कोर्टात धाव घेऊन ऑक्टोबर 22 मध्ये दावा दाखल केला होता. या दाव्यात न्यायालयाने २१ ऑक्टोबर २२ रोजी दाव्याचा निकाल लागेपर्यंत साईनगरचा वीजपुरवठा खंडित करू नये असे मनाई हुकूम चा आदेश महावितरणाला दिला होता. यावर साईनगर मार्फत महावितरणाला अनेक वेळा पत्र व्यवहार करूनही पूर्वीप्रमाणे विज बिल आकारणी करून द्या आम्ही बिल भरण्यास तयार आहोत पण महावितरणाने पत्राची दखल न घेता आपला मनमानी कारभार करून शेवटी अधिकाऱ्यांनी १९ मार्च रोजी साईनगर चा वीजपुरवठा खंडित केला कोर्टाच्या आदेशाचा अवमान केला. व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा यासाठी साईनगर ने पुन्हा कोर्टात धाव घेतली यावर न्यायालयाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून वीज पुरवठा सुरळीत करावा असे आदेश न्यायालयाने २२ मार्च रोजी दिले. परंतु या आदेशाची महावितरणाने पायमल्ली करत अजूनही म्हणजे २६ मार्च संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ही विज जोडणी केलीच नाही. त्यामुळे संबंधित साईनगर भागातून या अधिकाऱ्याविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे . सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे व नगरपरिषदेचा पाणीपुरवठा साईनगर भागात नसल्यामुळे साईनगर वाशियांची पाण्यासाठी वन वन भटकंती सुरू आहे . सध्या पाण्याची कळंब शहर व परिसरात तीव्र पाणीटंचाई असल्यामुळे व पाणीपुरवठा करणाऱ्या बोरचा महावितरणाने वीज पुरवठा खंडित केल्यामुळे नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला आहे . या अधिकाऱ्या विरोधात न्यायालयात पुढे काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे . या बाबत साई नगरवाशीयांनी लोकप्रतिनिधी आमदार , खासदार यांनाही याबाबतची विनंती करूनही त्यांनी याकडे पाठ फिरवल्याने नागरिकांतून यांच्या विषयी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे . वीज पुरवठा जर बुधवारी २७ मार्चला सुरळीत न झाल्यास शहरात रास्ता रोको आंदोलन करण्याचा पवित्रा नागरिकांनी घेतला आहे . सर्व साईनगर वाशियांच्या वतीने न्यायालयात ॲड . डी . एस . पवार हे बाजू मांडत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *