मानव अधिकार रक्षक परिषदेसाठी भाई बजरंग ताटे यांची ॲक्शन अँड स्वयंसेवी संस्थेच्या वतीने निवड

Spread the love

धाराशिव योद्धा
हनुमंत पाटुळे

कळंब दि.5(प्रतिनिधी)
मानवाधिकार रक्षक नॅशनल राष्ट्रीय परिषद उत्तर प्रदेश लखनऊ येथे दि.11 जुन ते 13 जून 2024 रोजी पर्यंत ॲक्शन एड या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने होत असलेल्या परिषदेसाठी मानव अधिकार रक्षक भाई बजरंग भाऊ ताटे यांची निवड झाली असून दि. 11 जुन ते 13 जून 2024 रोजी ॲक्शन ऍड संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या नॅशनल राष्ट्रीय मानवाधिकार रक्षक परिषदेला हिमाचल प्रदेश, भोपाळ, पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा, गुजरात, कर्नाटक,या सह महाराष्ट्र राज्यातील 500 मानव अधिकार रक्षक उपस्थित राहणार आहेत, महाराष्ट्रा मधून श्रमिक मानवाधिकार संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा लोकहित सामाजिक विकास संस्थेचे सचिव भाई बजरंग भाऊ ताटे हे उपस्थित रहाणार असुन, आदिवासी दलित, पारधी यांच्या सामाजिक प्रश्नांची मांडणी करून ठराव घेऊन महाराष्ट्र शासन व भारत सरकार यांना पाठवणार आहेत, महाराष्ट्रातील 65 हजार आधिवासी ,पारधी, दलित यांनी वन गायरान जमिनीवर शेतीसाठी केलेले अतिक्रमण व 76 हजार निवासी अतिक्रमण धारक यांनी केलेले अतिक्रमण कायदा करून त्यांच्या नावे करून निवासी अतिक्रमणधारकांना घरकुले देण्यात यावीत. तसेच शासनाच्या गरीबांसाठी शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी सरकारी कागदपत्र तसेच जी.आर. उपलब्ध करून त्यांना त्या त्या योजनेसाठी कसे पात्र होतील याची दक्षता घेण्यात येईल.तसेच बाल हक्क शिक्षणाच्या अधिकार, विधवांना पेन्शन, वृद्धधापकालीन पेन्शन,संजय गांधी, इंदिरा गांधी योजना इत्यादी योजना चा लाभ घेण्यासाठी लाभार्थींना सतत जागृत बनवण्यासाठी मदत करणार आहेत. तसेच शासनाच्या महत्त्वाच्या विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्या सोबत गाव, तालुका, जिल्हा, विभागीय राज्यस्तरावर बैठकिचे आयोजन करण्यात येणार आहे. लोकांना निवडून त्यांच्या शासनाच्या त्यांच्या कुवत व आवश्यकतेनुसार लाभदायी योजनेचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे. हवामान बदलाच्या परिणामावर विशेष लक्ष देऊन जनतेच्या भावना व त्यांचे मत ऐकून घेऊन शासन दरबारी व लोकप्रतिनिधींना त्यांच्याकडे प्रभावीपणे मांडणी करण्यात येणार आहे. गाव पातळी, वस्ती पातळीवरील कार्यकर्त्यांची निवड करून त्यांना प्रशिक्षण देणे, मेळावे आयोजित करणे, परिषदा घेणे इत्यादी कृती कार्यक्रम करून लक्ष वेधणे, शेतकऱ्यासाठी शेती विषयक विविध योजनेचा लाभ मिळवून देणे, अपंग व्यक्तींना विविध योजना मिळवून देऊन त्यांच्या जीवनमानामध्ये परिणामकारक बदल घडवून आणणे, दलित ,आदिवासी यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध शासन दरबारी आवाज उठवणे व त्यांना न्याय हक्क मिळवून देणे असंघटित कामगारांना संघटित करून त्यांना विमा मिळवून देणे एकल महिलांना शासन दरबारी न्याय हक्क मिळवून देणे, महाराष्ट्रातील ग्रामपंचायती 15 % टक्के खर्च मागासवर्गीयांसाठी खर्च करीत नाहीत त्यावर विशेष लक्ष देऊन मागासवर्गीयांसाठी ग्रामपंचायत कडून 15% टक्के खर्च करण्यास भाग पाडणे, इत्यादी प्रश्नांची मांडणी नॅशनल मानव अधिकार रक्षक परिषदेमध्ये मांडणी करणार असल्याचे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात भाई बजरंग ताटे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *