मानव अधिकार आंदोलन संघटनेच्या वतीने संजय लोंढे यांचा सत्कार

Spread the love

धाराशिव योद्धा
हनुमंत पाटुळे

कळंब दि.२७(प्रतिनिधी) कळंब तालुक्यातील हिंगणगाव येथील संजय लोंढे यांची मुलगी कु.प्राजली संजय लोंढे ही ज्ञानोद्योग विद्यालय कोथळा ता.कळंब जि.धाराशिव या शाळेत शिकत होती.या वर्षी च्या एस.एस.सी. परीक्षेमध्ये 99.80 % टक्के गुण घेउन उतिर्ण झाल्याने तिचे व पालक सरपंच संजय लोंढे यांचा मानव अधिकार आंदोलन संघटनेच्या वतीने कळंब येथे सत्कार करण्यात आला. या वेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.हनुमंत भाऊ पाटुळे, सरपंच वैजनाथ डोंगरे, सामाजिक कार्यकर्ते नवनाथ धेले, रमेश ताटे, हिंगणगावचे सरपंच संजय लोंढे, हिंगणगाव चे पोलीस पाटील धनराज आव्हाड, अनिल लोंढे, यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *