खासदार ओमराजे निंबाळकर यांची भुम तालुक्यातील गणेगाव येथे गाव दौरा भेट

Spread the love

धाराशिव योद्धा
जिल्हा प्रतिनिधी

धाराशिव दि.२८(प्रतिनिधी) धाराशिव जिल्ह्याचे खासदार मा.खासदार ओमराजे निंबाळकर यांची भुम तालुक्यातील गणेगाव या गावास गाव दौर्यानिमित्तभेट देण्यात आली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सदरील गाठी भेटी खासदार ओमराजे निंबाळकर घेत आहेत.त्या अनुषंगाने मौजे गणेगाव येथे दि.२२मार्च २०२४रोजी सायंकाळी ८:४५च्या सुमारास नागरिकांच्या व पदाधिकारी यांच्या गाटी भेटी घेण्यात आल्या या वेळी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली. या वेळी वालवड सर्कल पंचायत समिती गण प्रमुख युवा नेते अजय कोकाटे, सौ उर्मिला नारायण चव्हाण( माजी सरपंच गणेगाव), महीला आघाडी जिल्हा प्रमुख जिन्हती सय्यद,महीला आघाडी तालुका उप प्रमुख सानिया शेख, ए.बी.एस.क्रांती फोर्स संघटनेचे धाराशिव जिल्हा संपर्क प्रमुख रघुनाथ भाऊ पाटोळे,महीला आघाडी गण प्रमुख रुक्मीणी ताई मोरे, यांची या वेळी उपस्थिती होती.या वेळी मानव अधिकार आंदोलन संघटनेच्या भुम तालुका महीला अध्यक्षा सौ. राहीबाई रघुनाथ पाटोळे यांनी ही खासदार ओमराजे निंबाळकर यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. तर आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांना जाहीर पाठिंबा देत शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी गणेगाव व वालवड सर्कल पंचायत समिती गणामधील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *