सत्यमेव जयते महिला प्रभाग संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा हासेगांव (केज) येथे संपन्न

Spread the love

कळंब दि.15(प्रतिनिधी)ग्रामीण जीवन ज्योती उमेद अभियान कळंब यांच्या सत्यमेव जयते प्रभाग संघ मंगरूळ यांचा वार्षिक सर्वसाधारण सभा हासेगावं (केज) येथे संपन्न झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हसेगावं च्या सरपंच श्रीमती मनिषाताई पाटील व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आयबिसिबी अर्चना गडदे , एस.बी.आय शाखा व्यवस्थापक अभिजीत पडवळ, बँक ऑफ इंडिया शाखा व्यवस्थापक प्रीतम लांडगे , एम आय एस पडवळ सर आर्थिक समावेशन पवन, प्रभाग संघाच्या अध्यक्ष शबाना मोहम्मद सय्यद, प्रभाग समन्वय डिकसळ खंडू बर्डे, प्रभाग समन्वयक मंगरूळ सूर्यकांत खेडकर, सचिव श्रीमती कल्पना रामराजे कुलकर्णी , श्रीमती सुरेखा सहदेव इंगळे कोषाध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये सावित्रीबाई फुले ,जिजामाता यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . कार्यक्रमाची प्रस्तावना सूर्यकांत खेडकर प्रभाग समन्वयक यांनी केले. महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी व त्यांना आर्थिक सक्षम बाजू मजबूत करण्यासाठी ग्रामीण जीवन ज्योती अभियान काम करत आहे असे ग्रामीण जीवन ज्योती अभियानाच्या आय.बी.सी.बी श्रीमती अर्चना गडदे म्हणाल्या. एस.बी.आय बँक व्यवस्थापक अभिजीत पडवळ बोलताना म्हणाले महिलांना सक्षम करण्यासाठी कर्ज प्रस्ताव आमच्या बँकेकडे जमा करा , आम्ही ते वितरित करण्यासाठी तयार आहोत. आमच्या माता -भगिनी बचत गटाच्या माध्यमातून सक्षम बनवण्याचे काम ग्रामीण जीवन ज्योती उमेद अभियान व बँक कार्यक्षमपणे काम करण्यास तयार आहे . बँक ऑफ इंडियाचे प्रीतम लांडगे म्हणाले की बचत गटाच्या माध्यमातून कुटुंबाला वेगवेगळ्या योजना भेटत आहेत कर्ज प्रस्ताव आमच्या कडे सुपूर्द करा. आम्ही तातडीने पाठपुरावा करू तसेच महिलांनी एच.डी.एफ.सी, आयसीसी बँकेचे कर्ज सोडून राष्ट्रीय बँकेचे कर्ज घ्यावे असे आवाहन केले . तसेच जे गाव बँकेला दत्तक नाही त्या गावांना सुद्धा कर्ज देण्याची ग्वाही त्यांनी दिली. या कार्यक्रमासाठी मंगरूळ प्रभाग संघातून सर्व सीआरपी व महिला सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष गटाचे सचिव अशा 176 महीला उपस्थित होत्या. उपस्थित महिलांसाठी अल्पउपाहराचे आयोजन करण्यात आले होते .
कार्यक्रमामध्ये अहवाल वाचन खेडकर सूर्यकांत यांनी केले यामध्ये मागील वर्षाचा अहवाल वाचून पुढील वर्षाचे नियोजन प्रभाग संघ एकूण गट संख्या 230 आहे त्यापैकी पहिला हप्ता 220 गटाला मिळाला 33 लाख रुपये , दुसरा हप्ता 190 गटाला 28 लाख 50 हजार रुपये. प्रभागात एकूण पंधरा ग्राम संघ आहेत एकूण व्यवस्थापन निधी 15 ग्रामसंघ यांना आठ लाख 25 हजार रुपये व्यवस्थापन निधी प्राप्त तीन ग्राम संघाला ,व्ही आर एफ 2 लाख 25 हजार प्राप्त ,15 ग्राम संघाला सीआयएफ निधी प्राप्त आहे एकूण 40 लाख 50 रुपये प्राप्त आहे या आर्थिक वर्षात बँक लिंकेज 107 गटाला झाला आहे आणि एकूण कर्ज वाटप तीन कोटी 76 लाख रुपये वाटप करण्यात आले आहे तसेच सी. एम. ए. जी आणि पी. एम. ए .जी पी अंतर्गत रक्कम 14 लाख रुपये एसबीआय बँक कळंब .तसेच हासेगाव (केज) च्या सीआरपी अश्विनी यादव यांनी या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता मुंढे यांनी तर आभार प्रदर्शन सीआरपी अंजली यशवंत जाधव यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *