वाशी येथे जलजीवन मिशन अंतर्गत दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर संपन्न

Spread the love

धाराशिव योद्धा
हनुमंत पाटुळे

कळंब दि.८(प्रतिनिधी)
जिल्हा परिषद धाराशिव व पंचायत समिती वाशी यांच्या वतीने वाशी येथील सभागृहात गटविकास अधिकारी मोराळे साहेब, श्री मुळे साहेब समूह संघटक श्री शेळके साहेब यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. हा कार्यक्रम देवऋषी एज्युकेशन सोसायटी उत्तराखंड यांच्या मार्फत घेणार्या कार्यक्रमात संस्थेचे श्री अनिल राऊत यांनी संकल्प संकल्पना व चित्र फीती द्वारे व खेळाच्या माध्यमातून जलजीवन मिशन मधील कामाची देखभाल दुरुस्ती कशी करायची याची सविस्तर माहिती दिली. या नंतर कार्यक्रमात जाणीव संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ लगाडे यांनी पाणी हे जीवन आहे जल मिशन म्हणजेच लोक चळवळ होऊन प्रत्येकाने पाण्याची काटकसर व शुद्ध पाणी कसे मिळेल यावर माहिती दिली. या नंतर सहयोगी श्री राजू कांबळे सर विजय धर्माळ तसलीम तळवी शाहरुख तळवी यांनी कार्यक्रम यशस्वीसाठी परिश्रम घेतले यावेळी सरपंच सुनील जाधवर यांनी अनुभव कथन केले. या कार्यक्रमाला तालुक्यातील जलसुरक्षक ग्रामसेवक सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *