खामसवाडी जि.प.प्राथमिक शाळेत स्वयंशासन दिन उत्साहात साजरा

Spread the love

धाराशिव योद्धा
हनुमंत पाटुळे

खामसवाडी दि.१४(प्रतिनिधी) कळंब तालुक्यातील खामसवाडी येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दि.१३मार्च २०२४रोजी स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला.या दिवशी मुख्याध्यापक म्हणून श्री निवास सतीश वैद्य तर उप मुख्याध्यापक प्रसाद सोमनाथ हिरे यांची निवड करण्यात आली.इतर सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षक म्हणून वर्ग अध्यापनाचा अनुभव घेतला.मुख्याध्यापक श्रीनिवास वैद्य व उप मुख्याध्यापक प्रसाद हिरे यांनी दिवसभरातील शालेय व्यवस्थापनाची जबाबदारी अत्यंत चोखपणे बजावली.सर्व शिक्षकांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे अध्यापन केले.विद्यार्थ्यांची मनोगते घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कोळी टी.बी,श्री.पाटील धनाजी,बाबर अनंत, बाकले शिवराज,मुंडे विक्रम,शेळके नागनाथ, मोरे पंकज,मडके अनंत, कराळे तुकाराम, माने रोहिणी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *