दत्तात्रय लांडगे यांनी शिक्षणाधिकारी (मा.) पदाचा पदभार स्वीकारल्याबद्दल कळंब मध्ये सत्कार

Spread the love

दत्तात्रय लांडगे यांनी शिक्षणाधिकारी (मा.) पदाचा पदभार स्वीकारल्याबद्दल कळंब मध्ये सत्कार

धाराशिव योद्धा
हनुमंत पाटुळे

कळंब दि.22(प्रतिनिधी) लोकसेवा आयोगाकडून दत्तात्रय लांडगे यांची उपशिक्षणाधिकारी पदी निवड झाली होती व त्यांनी धाराशिव जिल्हा परिषद मध्ये उपशिक्षणअधिकारी (माध्यमिक ) पदभार स्वीकारलेला होता .पण शिक्षण अधिकारी (मां.) सुधा साळुंखे या रजेवर गेल्यामुळे दत्तात्रय लांडगे यांनी प्रभारी शिक्षणाधिकारी या पदाचा पदभार 22 मे रोजी स्वीकारला त्याबद्दल त्यांचा सत्कार कळंब येथे मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आला.धाराशिव जिल्हा परिषद मध्ये त्यांचे वडील शिवाजी लांडगे हे सेवक पदावर कार्यरत होते या परिस्थितिची जाणीव ठेवून धाराशिव जिल्हा परिषद मध्येच उपशिक्षणाधिकारी ते प्रभारी शिक्षणाधिकारी या पदाचा पदभार त्यांनी स्वीकारला .महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सन 2017 मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशासन शाखा) गट ब मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा -2017 महाराष्ट्र शिक्षण सेवा या संवर्गातून असलेले दत्तात्रय शिवाजी लांडगे यांची उपशिक्षणाधिकारी गट ब या पदावर निवड झाली होती. ते धाराशिवचे भूमीपूत्र दत्तात्रय लांडगे हे महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते.
दत्तात्रय लांडगे यांचे 10 वी पर्यंतचे शिक्षण छत्रपती शिवाजी हायस्कूल 12 पर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद मल्टी प्रशाला उस्मानाबाद , पदवीचे व बी.एड चे शिक्षण स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था उस्मानाबाद व पदव्युत्तर शिक्षण डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे झाले आहे.यापूर्वी ते शासकीय अध्यापक विद्यालय नेकनुर येथे प्रभारी प्राचार्य म्हणून कार्य केले आहे नगर परिषद प्राथमिक शाळा क्र. 1 च्या उपक्रमशील मुख्याध्यापिका श्रीमती रेजा पायाळ ( लांडगे) यांचे ते पती आहेत.
शिक्षणाधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल दत्तात्रय लांडगे यांचे व त्यांचे मित्र चिमने सर यांनी पनवेल येथे शिक्षणाधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्या बद्दल मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश टेकाळे, डॉक्टर अशोक शिंपले, ह.भ.प महादेव महाराज अडसूळ, नारायण लोकरे सर, श्यामसुंदर पाटील सर, सतीश मडके सर, ऋतुराजे महिला ग्रामीण बँकेचे चेअरमन उद्धव गपाट ,पत्रकार संभाजी गिड्डे , प्रदिप यादव , माधवसिंग राजपुत तसेच सर्व मित्रपरिवार, शिक्षक बांधवांनी व कुटूंबीय यांनी या यशाबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *