खामसवाडी येथे सुबोध रामायण पुस्तकाचे प्रकाशन

Spread the love

धाराशिव योद्धा
हनुमंत पाटुळे

खामसवाडी दि.९(प्रतिनिधी) कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे दि.९ एप्रिल २०२४ रोजी येथील ज्येष्ठ नागरिक तथा ॲडव्होकेट उद्धव शेळके लिखीत सुबोध रामायण पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.सदरील प्रकाशन येथील ग्रामदैवत रोकडेश्वरी सभागृहात तेरणा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन बाळासाहेब पाटील यांचे हस्ते करण्यात आले. या वेळी हभप पांडुरंग लोमटे महाराज, अँड मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ग दि माडगुळकर यांनी पद्य स्वरुपात सुबोध रामायण लिहिलेले आहे, त्याचे गद्य स्वरूपात लिखाण खामसवाडी येथील उद्धवराव शेळके यांनी लिखाण करून पुस्तक तयार केले. त्या पुस्तकाचे प्रकाशन दि. ९ एप्रिल रोजी करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक उद्धव शेळके यांनी केले.तर हभप पांडुरंग लोमटे महाराज यांनी रामायण व महाभारतातील अनेक प्रसंग सांगितले, वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी उद्धव शेळके यांनी सुबोध रामायण लिहुन पुस्तक तयार केले. काम करणार्या व्यक्तीस आवाड असल्यास वयाची मर्यादा नसते असे कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी म्हणाले. कार्यक्रमाचे सुञ संचलन सुंदर माळी यांनी केले तर आभार प्रकाश जोशी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *