कळंब येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन

Spread the love

धाराशिव योद्धा
हनुमंत पाटुळे

कळंब दि.२९(प्रतिनिधी) कळंब येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मारक समितीच्या वतीने दिनांक २८ मे रोजी स्वतंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात औसा विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार अभिमन्यू पवार यांनी उपस्थिती लावली व त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मेन रोड कळंब येथील अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांनीही अभिवादन केले. स्मारक समितीच्या वतीने कळंबचे चे माजी नगराध्यक्ष यशवंत दशरथ यांनी आमदार अभिमन्यू पवार यांचा सत्कार केला. या प्रसंगी स्मारक समितीचे,मकरंद पाटील ,प्रकाश भडंगे, संजय बोंदर, संदीप बावीकर, रवी नरहिरे ,माणिक बोंदर, संजय जाधवर ,शिवाजी गिड्डे, विकास कदम, हर्षद अंबुरे, दत्तात्रय लांडगे , अनिल यादव, संतोष भांडे ,किरण फल्ले, राजाभाऊ कोळपे, गजानन मुंडे, अशोक क्षीरसागर ,नाना शिंगणापुरे, संताजी वीर, महेश जोशी ,अनिल कुलकर्णी, सतीश मडकर ,विलास खांडेकर ,देशमाने, पुरोहित जोशी यांच्यासह भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *