वंचित विकास जाणीव संघटनेच्या वतीने दैवशाला थोरबोले यांना राज्यस्तरीय अभया पुरस्काराने सन्मानित

Spread the love

धाराशिव योद्धा
हनुमंत पाटुळे

कळंब दि.२९(प्रतिनिधी) वाशी तालुक्यातील गोजवाडा येथील दैवशाला सुंदर थोरबोले यांचा कर्तुत्वान महिला म्हणून वंचित विकास जाणीव संघटनेच्या वतीने अभया दशकपूर्ती राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या मध्ये त्यांचा सन्मान पुणे येथील अश्वमेध हॉलमध्ये मेधा राजहंस, श्रीमती माधुरी ताम्हणे, वंचित विकास संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा, संस्थेच्या कार्यवाहक मीनाताई कुर्लेकर, संचालक सुनिता जोगळेकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांनी केलेल्या जीवनातील संघर्ष व पतीचे निधन झाल्यावर दोन मुलांचा सांभाळ करून शेती सुधारून, बागायत करून, मुलाला इंजिनियर व बी फार्मसी यामध्ये शिक्षण देऊन समाजात व कुटुंबाचा जाच सहन करून त्यांनी सुंदर बंगला बांधला आहे. तसेच त्यांच्या सारख्या महिलांना त्यांनी मदतीचा हात दिला आहे. सध्या कुक्कुटपालन, मिरची कांडप, पिठाची गिरणी हा व्यवसाय त्या स्वतः पाहत आहेत. त्यांना आतापर्यंत अहिल्यादेवी होळकर व इतर तीन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्याबरोबरच वाशी तालुक्यातील राजश्री कोरे, रुक्मिणी गायकवाड, किरण गायकवाड ,अंजू गायकवाड, सीमा लगाडे ,जाणीव संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ लगाडे यांचा ही सत्कार या वेळी करण्यात आला. सदरील पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *